breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारण

पब बंद होणार नसतील तर मी कुणाची माफी मागणार नाही, रवींद्र धंगेकारांची रोखठोक भूमिका

पुणे : पुण्यातील पोर्श कारने दोन अभियंत्यांना चिरडले होते. श्रीमंत बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली होती. त्यावेळी रवींद्र धंगेकरांनी विरोध केला. माध्यमांनी हे प्रकरण लावून धरेल. त्याचा मोठा परिणाम दिसून आला. पोलिसांनी चांगला तपास केला आहे पण अजूनही हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप धंगेकरांनी केला आहे. अर्थात त्यांचा इशारा कुणावर हे वेगळं सांगायला नको.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यात काळिमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. उडता पंजाब सारखं उडतं पुणे किंवा उडता महाराष्ट्र म्हणायची वेळ आली आहे. लोकशाही पद्धतीने मी रस्त्यावर आलो, पब संस्कृती थांबली पाहिजे ही भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुण्यामध्ये देशभरातील सर्व शहरातून मुलं शिकण्यासाठी येत आहेत. इतर देशातील शहरातून येणाऱ्या मुलांच्या पालकांचे फोन येत आहेत. पुण्यातील नागरिक गप्प बसणार नाही हे लक्षात आल्यावर दोन पोलीस निलंबित केल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा – Property Tax Exemption । मालमत्ता कर सवलत योजनेला मुदतवाढ द्या : आमदार महेश लांडगे

रक्त फेकून देण्यापर्यंतचा अपराध लॅबमधील डॉक्टरांनी केला.पोलिसांनी चांगला तपास केला आहे पण अजूनही हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे.पैसे टाकून सिस्टीम विकत घेऊ शकतो ही त्या श्रीमंतांची भूमिका होती. आम्ही मंत्र्यांवर टिका केल्यानंतर माझा राग आला. मी हसन मुश्रीफ यांची माफी मागतो पण पुण्यातील पब संस्कृती बंद केली पाहिजे. पब बंद होणार नसतील तर मी कुणाची माफी मागणार नाही. मी कुणाला घाबरत नाही, नोटीस द्या नाहीतर आणखी काही करा, अशी रोखठोक भूमिका त्यांनी घेतली.

हसन मुश्रीफ यांच्या काळात डॉक्टर कसे वागतात हे त्यांना माहिती आहे. काळे याला बाजूला करून आपल्या मनाचा अधिकारी त्याठिकाणी आणला जातोय का अशी शंका येत आहे. पुण्यात येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या संरक्षणासाठी मी रस्त्यावर उतरणार आहे. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर मी पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे. मला नोटीस पाठवण्यापेक्षा चुकीच्या गोष्टी बंद करा. मी मंत्र्यांच्या मतदारसंघात, मंत्र्यांच्या घरासमोर जाऊन माझं म्हणणं मांडणार आहे माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा करून पैसे मागितले तर माझ्याकडे पैसे नाही मी जेलमध्ये जाईन, असे धंगेकर म्हणाले.

यावेळी धंगेकरांनी सत्ताधाऱ्यांना डिवचले. 4 तारखेनंतर मी विधानसभेत नसेन तर लोकसभेत असेन असा दावा त्यांनी केला. ललित पाटील प्रकरणी देखील मी हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याचे ते म्हणाले. सत्तेपायी वडिलांसारख्या शरद पवार यांना सोडून जाणाऱ्या मुश्रीफ यांनी धमकी देऊ नये, असा इशारा त्यांनी दिला. तानाजी सावंत हा भ्रष्टाचारी माणूस आहे, असा आरोप त्यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button